Sample of marathi translation (When did the Mahabharata War happen?)

Marathi translation of my book (portion of 10th chapter), my attempt at translation.

10 डॉक्टर वर्तक यांचा सिद्धांत – महाभारत युद्धाचा दिनांक

“विचारांच्या क्षेत्रात अनेकवेळा आपल्या जवळपास असणाऱ्या सिद्धांतावरच जास्त आक्षेप घ्यावा लागतो. आदी शंकराचार्यांनी ‘नास्तिक’ वादापेक्षाही सांख्य मताचे खंडन अधिक केले आहे, सांख्यवाद स्वताच्या मताशी जास्त जवळचा असूनही. मला वाटते याचे कारण हे कि वैचारिक द्रीष्ट्या आपल्या जवळच्या विचारात फारच कमी अंतर असल्यामुळे लोकांना या जवळच्या मतांबद्दल संभ्रम होण्याचा संभव जास्त असतो. यासाठीच निकट वाटणारया विचारांचे नीट प्रतिपादन करून आणि नंतर त्यांचे मंडन आणि खंडन करणे हे महत्वाचे. अती भिन्न विचारांमधील नक्की फरक मग सहजच समजतो.”

 – आचार्य विनोबा भावे

मला माहिती असलेल्या महाभारत युद्धा संबंधित सर्वच प्रस्तावांचे मी परीक्षण केले, ज्यामध्ये अरुंधती युगाच्या (११०९१ क्रीस्थ पूर्व ते ४५०८ क्रीस्थ पूर्व) मर्यादा बाहेरचे हि प्रस्ताव होते. माझ्या हाणून पडण्याच्या प्रयत्नामध्ये न बळी गेलेला प्रस्ताव म्हणजे डॉक्टर वर्तकांनी मांडलेला युद्धाच्या १८ दिवसांचा प्रस्ताव. माझा प्रस्ताव; विशेषता युद्ध पूर्व आणि युद्धा नंतर च्या घटना साठींचा, हा वर्तकांच्या प्रस्तावापेक्षा वेगळा आहे.
वाचकांना, विशेषता वैद्यानिक पद्धतीची माहिती ज्यांना आत्मसात झालेली नाही त्यांना, असा प्रश्न पडेल कि जर मला युद्धाच्या १८ दिवसांचा वर्तकांचा प्रस्ताव जर मान्य आहे तर नवीन पुस्तक लिहायची गरजच काय? युद्ध पूर्व आणि युद्धा नंतर च्या घटना मध्ये थोडा फार फरक असेल तर त्यात काय ते एवढे विशेष? यामागचीच भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी हा अध्याय लिहिला आहे. या अध्याया मध्ये मी डॉक्टर वर्तकांच्या संशोधनावर खूप टीका टिप्पणी करणार आहे, तेव्हा एका गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करणे गरजेचे आहे. मी डॉक्टर वर्तक आणि त्यांच्या सर्वच संशोधनावर फिदा आहे आणि ऋणी सुद्धा.

महाभारत कालनिर्णयाच्या संदर्भात मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे डॉक्टर वर्तकांचे ‘स्वयंभू’ . तब्बल १२ वर्षानंतर, आणी अनेक भाषेतील याच संदर्भातील अनेक पुस्तके वाचल्यानंतरही, ‘स्वयंभू’ हे सर्वोत्तम हेच माझे मत कायम आहे. आणखी एक याच संदर्भात लिहिलेले पुस्तक कि ज्याची तुलना ‘स्वयंभू’ शी होऊ शकेल—clarity , समग्रता आणी खोली या अर्थाने.. ते म्हणजे भारत रत्न आणी महामहोपाध्याय म्हणून गौरविले गेलेले पांडुरंग वामन काणे यांचे ‘धर्मशास्त्राचा इतिहास – खंड ३’. या पुस्तकाची समग्रता, खोली, तर्कबद्धता, वैद्यानिक दृष्टीकोन या दृष्टीनेही ‘स्वयंभू’ शी केलेली तुलना योग्यच ठरेल. या पुस्तकासंदर्भात मला वाटलेले आश्चर्य म्हणजे हे कि ज्या पुस्तकाचा मुख्य विषय ‘धर्मशास्त्र’ हा आहे त्यामध्ये महाभारत कालनिर्णयासंबंधात खोलात जाऊन केलेले संशोधन, परीक्षण आणी विवेचन!

डॉक्टर वर्तकांच्या महाभारत कालनिर्णयावरील कामाबद्दल मी टीका टिप्पणी करणार आहे याची दोन करणे आहेत. (१) त्यांचे काम टीका टिप्पणी करण्याच्या योग्यतेचे तर आहेच पण (२) त्यांनी केलेल्या विषयसंगत मांडणीमुळे टीका टिप्पणी करणे हि शक्य झाले आहे. त्यांनी प्रतिपादित केलेले महाभारत युद्धाचे वर्ष अरुंधती युगाच्या कालखंडात तर बसतेच पण इतकेच नव्हे तर महाभारत युद्धाच्या १८ दिवसांचा कालनिर्णय हा मी त्यांच्याकडून उसना घेतलेला आहे. तरीही, किवां या दोन गोष्टीमूळेच, मला हे स्पष्ट करणे अगत्याचे वाटते कि त्यांच्या महाभारत कालनिर्णयावरील कामाला मी जो सर्वोत्तम हा शेरा दिला आहे त्याचा संबंध या वरील दोन गोष्टींशी अजिबात नाही.

मी जेव्हा पहिल्यांदा ‘स्वयंभू’ वाचले, तेव्हा डॉक्टर वर्तकांनी काढलेले महाभारत युद्धाचे वर्ष, म्हणजेच ५५६१ ख्रिस्त पूर्व, वाचून विश्वासच बसला नाही. सांगायचा मुद्दा हा कि एक ठराविक वर्ष प्रतिपादन केले म्हणून त्यांचे काम मला आवडले असे नाही. डॉक्टर वर्तकांच्या कामाचा माझ्यावर प्रभाव पडण्याचे कारण म्हणजे त्यांची संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत, दिलेल्या विषयासंबंधात शोधून काढलेल्या किंवा उपलब्ध असलेया सर्वच संदर्भांचे आणि पुराव्यांचे परीक्षण करण्याचा त्यांचा आग्रह – मग हे संदर्भ/पुरावे त्यांनी काढलेल्या निकषाला जोड देणारेच नव्हे तर तो निकष कदाचित नेस्तनाबूत करणारे असले तरीही. स्वताच्या इभ्रतीची पर्वा न करता, भारताच्या पूर्वइतिहासाच्या संबंधातील विषयावरील संशोधनाकरिता जोखीम घेण्याची तयारी, स्वताच्या चुका मान्य करण्याचा दिलदारपणा, वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे आणि वैज्ञानिक विश्लेषण पद्धतीचे उपजत ज्ञान,
कोणत्याही वैज्ञानिक सिध्दांताची वैधता हि तात्पुरती म्हणजेच त्याहूनही नवीन आणि जास्त श्रेयस्कर सिद्धांत सुस्थापित होईपर्यंतच हि समज, अशा आणि आणखी इतर अनेक गोष्टी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s