In the news (Maharashtra Times) – courtesy: Atri

उत्खननात हडप्पापेक्षा दोन हजार वर्षे जुनी भांडी सापडली

भारतीय संस्कृतीचे मूळ सरस्वतीच्या काठी?

भोरसैदा गावाजवळ पावसाळ्यात प्रकटणारी सरस्वती नदी

मयुरेश प्रभुणे, फतेहगड (हरियाणा)

प्राचीन सरस्वती नदीच्या काठावर वसलेली सारस्वत संस्कृती ही सिंधू संस्कृतीपेक्षा प्राचीन असल्याचे पुरावे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. सरस्वतीच्या काठावरील कुरुक्षेत्र, फतेहगड आणि सिरसा या भागांतील पुरातन ठिकाणी केलेल्या उत्खननातून हे नवे संशोधन समोर आले आहे.

आतापर्यंत हडप्पाकालीन संस्कृती ही भारतातील सर्वांत जुनी (इसवी सन पूर्व ३५०० ते ४०००) प्रगत संस्कृती मानण्यात येत होती. मात्र, सरस्वतीच्या खोऱ्यात वसलेल्या बिरडाणा आणि गिरावड या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंच्या साह्याने निश्चित करण्यात आलेला कालावधी इसवी सन पूर्व ६००० वर्षे म्हणजे हडप्पा संस्कृतीपेक्षाही दोन हजार वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.

आदिबद्री या सरस्वतीच्या उगमापासून तिच्या जुन्या प्रवाहाच्या मार्गाने प्रवास सुरू केल्यावर तिच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे आजही उत्खनन झालेल्या साइटमधून, या भागाच्या भौगोलिक रचनेवरून आणि लोकांच्या श्रद्धांमधून मिळत असल्याचे आढळून येते.

सरस्वतीच्या पाण्यातून निर्माण झालेल्या कुरुक्षेत्राच्या सिन्निहित सरोवरात पवित्र स्नान करणारे साधू, पिहोवाला सरस्वतीच्या काठावर रोज संध्याकाळी होणारी नदीची आरती आणि सरस्वतीच्या कोरड्या पात्रात घेतलेले पीक हे सर्वोत्तम असल्याची धारणा असणारा शेतकरी… सरस्वती आजही लोकांच्या मनात प्रवाहित असल्याची साक्ष देतात. कुरुक्षेत्र-पिहोवा मार्गावरील भोरसैदा या गावात सरस्वती नदीच्या कोरड्या पात्रातून फिरताना पात्राच्या भिंतींमध्ये मातीची भांडी, मानवी सांगाडे, मातीच्या बांगड्या स्पष्टपणे पाहता येतात.

कुरुक्षेत्रातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण संग्रहालयाचे क्यूरेटर डॉ. राजेंदर राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेद, महाभारत आणि पुराणांमध्ये उल्लेख झालेल्या कुरुक्षेत्र परिसरातील ३६० तीर्थस्थळांच्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. त्यातील १३४ ठिकाणी प्रगत संस्कृती दाखवणाऱ्या वसाहती पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. या वसाहतींच्या सुनियोजित रचना, सापडलेली भांडी, हत्यारे, खेळणी, दागिने आदी सर्व गोष्टी सरस्वती संस्कृती प्रगत असल्याचेच सिद्ध करतात.’

सरस्वतीच्याच मार्गाने अग्रोहा, बाणवली, कुणाल आदी महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन आमचा प्रवास सुरू होता. मनात विचार आला, सरस्वतीच्या खोऱ्यात आता कुठे उत्खननाला सुरुवात झाली आहे… लुप्त सारस्वत संस्कृती ज्या वेळी पूर्ण प्रकट होईल. इतिहासाची पुस्तके नक्कीच बदलावी लागतील.

सरस्वतीच्या काठावरूनच प्राचीन संस्कृतीचे स्थलांतर

सरस्वतीच्या खोऱ्यात संशोधन करणारे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे सहसंचालक डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितले, ‘गेल्या तीन दशकांत कुरुक्षेत्र, फतेहगड आणि सिरसा जिल्ह्यांत सरस्वतीच्या काठावर अनेक हडप्पाकालीन वसाहती सापडल्या. त्या साइटवर सापडलेल्या वस्तूंचे साधर्म्य हडप्पा संस्कृतीशी असल्यामुळे सरस्वती आणि सिंधू संस्कृती समकालीन असल्याचे मानण्यात आले. मात्र, फतेहगडजवळ सरस्वतीच्याच खोऱ्यात असणाऱ्या बिरडाणा आणि गिरावड या ठिकाणी सापडलेल्या मातीच्या वस्तूंचा ‘कार्बन १४’ पद्धतीने निश्चित करण्यात आलेला कालावधी इसवी सन पूर्व ६००० इतका आहे. हा कालावधी हडप्पा संस्कृतीपेक्षा दोन हजार वर्षांनी जुना आहे.’

gist in english – They found remains of civilization dated approx 6000 BCE on the banks of now extinct Saraswati River. The dating was done based on carbon-14 method. The excavations were done around Kurukshetra. It appears (from this) that INdus valley civilization was in fact continuation of older Saraswati valley civilization. Talegiri calls IVC as Saraswati-Sindhu Civilization. This nomenclature now has an archaeological evidence backing it..

Geological studies say that saraswati dried up when Satlun and Yamuna changed their courses to meet Sindhu and Ganga respectively, thereby drying up the Saraswati. Even sources like Mahabharata state this gradual dessication of Saraswati (seasonal Ghaggar-Haakra river, as it is called today).

Advertisements

2 thoughts on “In the news (Maharashtra Times) – courtesy: Atri

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s